गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; हजारो महिलांनी महामार्ग रोखला
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे संतापाचा उद्रेक झाला. हजारो महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि महामार्ग रोखला.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण चामोर्शी तालुक्यात जनक्षोभ उसळला आहे. ११ जून रोजी, हजारो महिला, तरुणी आणि नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी चामोर्शी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
यावेळी, पोलीस ठाण्याच्या परिसरात "आरोपीला फाशी द्या!" आणि "न्याय मिळालाच पाहिजे!" अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. संतप्त महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी बोलावण्याची मागणी केली. काही वेळाने आंदोलन अधिक तीव्र झाले आणि महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले.
गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी एक सशक्त आरोपपत्र दाखल केले जाईल. त्याला जामीन मिळू नये यासाठी कायदेशीर प्रयत्न केले जातील.
Edited By- Dhanashri Naik