संबंधित माहिती
- अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग,आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई, चार जणांना अटक
- अहमदनगर आग दुर्घटनाः सरकारची कठोर कारवाई; चौघे निलंबित तर दोघांची सेवा समाप्त
- अहमदनगर ब्रेकिंग : मयतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली अंगावर काटा आणणारी माहिती
- ‘या’ कारणामुळे लागलीअहमदनगर जिल्हा रुग्णालयास आग ?
- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत – पालकमंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार!
अहमदनगरमध्ये शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात हि घटना घडली असून आरोपीने पीडित महिला घरात एकटी असताना तिच्या घरात घुसून एक हे दुष्कृत्य केले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पीडित महिलेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान, पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
