‘या’ कारणामुळे लागलीअहमदनगर जिल्हा रुग्णालयास आग ?
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी ही आग विझवली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.
ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
आयसीयूला आग लागल्याचं समजताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. प्रत्येक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचं ते म्हणाले.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाईल. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.