1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (16:55 IST)

राज्यात पुणे-नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, शनिवारी पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते.
 
पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने शनिवारी यलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून मुंबईत गेल्या 24 तासांत 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारनंतर राज्यात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे.