1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सिद्धिविनायकाचरणी 750 किलोचा मोदक अर्पण

750 kg modak to siddhivinayak ganapati
मुंबई- मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही 750 किलो वजनाचा माव्याचा मोदक प्रभादेवी येथील श्रीसिद्धीनिवायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर, न्यासचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सुशांत शेलार उपस्थित होते.
 
दूध, साखर, आणि माव्याच्या सहाय्याने तयार केलेला महामोदक प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथून सिद्धिविनायक मंदिराकडे आणण्यात आला. या दरम्यान प्रभादेवी येथील रस्त्यावर आणि सिद्धिविनायक मंदिरा परिसरात महामोदक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. महामोदक तयार करण्यासाठी 15 आचारी 9 दिवस काम करत होते. हा दहा फूट उंचीच्या मोदकाचा साचा तयार करण्यासाठी 8 दिवस लागले.