नाशिक येथे बसला आग लागून 8 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये काल रात्री एका खासगी बसला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर एकूण मृतांचा आकडा समोर येईल, असंही ते म्हणालेत.
एबीपी माझाच्या बातमीनुसार, नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे ही खासगी बस चालली होती. दरम्यान या बसला आग लागली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.Maharashtra | Nashik Police confirms that several people are feared to be dead as a bus caught fire in Nashik last night. Further details awaited. pic.twitter.com/s75A6RnYHO
— ANI (@ANI) October 8, 2022
Published By -Smita Joshi

