रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागपूर-दुरांतो दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरले

मुंबई-कसारा घाटाजवळ नागपूर-दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मदतकार्य करताना डोक्यावर ओव्हर हेड वायर पडल्याने रेल्वे प्रशासनाचे 6 कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचा-यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्ती जवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले आहेत. यानंतर घटनास्थळी मदत कार्यासाठी रेल्वे कर्मचारी दाखल झाले. मदतकार्य करत असताना अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे ओव्हरहेड वायर डोक्यावर पडल्यामुळे हे सहा कर्मचारी जखमी झाले आहे. यामुळे प्रवासांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक गाड्या इगतपुरी, लासलगाव, अस्वली जळव थांबवण्यात आल्या आहेत.