मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (21:05 IST)

पोलीस आयुक्तालयातील ९४ पोलिसांना कोरोनाची लागण

नाशिक पोलीस आयुक्तालयातील ९४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तिस-या लाटेत एवढया मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान पोलिस आयुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यांत कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे. कोरोनाची लागण झालेल्यापैकी अनेक पोलीस कर्मचारी गृह विलगीकरणात उपचार घेतले जात आहेत. तसेच पोलीस मुख्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे दहा ते पंधरा कर्मचारी उपचारासाठी दाखल आहेत. आठ ते दहा पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. त्यात ९४ पोलिसांना कोरोना लागण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.