1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (18:15 IST)

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, गटातील 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

uddhav eknath
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आला असून शिंदे गटाच्या 15 जागांपैकी केवळ 7 जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या असून त्यांना 9 जागांवर विजय मिळाला आहे. 
 
शिंदे गटाच्या महायुतीला पण पराभव मिळाला आहे. हा धक्का शिंदे आणि महायुतीसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान शिंदे गटातील 5 ते 6 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
हा दावा उद्धव ठाकरे गटातील एका बड्या नेत्याने केला असून एका वृत्तवाहिनीने हे प्रसारित केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंशी संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे आमदार कोण आहे अद्याप समजू शकले नाही. 
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणात हा मोठा भूकंप येऊ शकतो. शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने ही माहिती दिली आहे. आता हे आमदार कोण आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत देखील अस्वस्थता जाणवत आहे. 
 
Edited by - Priya Dixit