1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. A big decision of the state government, 'this' certificate is required

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'हे' सर्टिफिकेट आवश्यक

A big decision
बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
 
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.
 
राज्यात बऱ्यापैकी लसीकरण झालं आहे. त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात दररोज 7 ते 9 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.