सोमवार, 16 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (13:27 IST)

पुणे- पंढरपूर महामार्गावर कार आणि टेम्पोची धडक, चौघांचा जागीच मृत्यू

पुणे- पंढरपूर महामार्गावर रविवारी कार आणि भरधाव येणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील  करुंदे ता. माळशिरस येथे पुणे -पंढरपूर मार्गावर रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अपघात झाला असून अपघातात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अपघातात मयत होणारे साताऱ्याच्या कास पठार फिरायला गेले असता परत येताना चुकीच्या दिशेने गाडी चालवत असताना पुलावरून समोर येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा समोरून चक्काचूर झाला आहे. कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळतातच सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले.  
Edited by - Priya Dixit