मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (08:42 IST)

गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
जळगाव इथल्या मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून एडवोकेट विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी वकील विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नाही तर अधिक माहितीनुसार, या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.