राज्यात पुन्हा एकदा ६ हजार १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात शुक्रवारी ६ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ८५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८ हजार ५५० इतकी झाली आहे. यापैकी १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण बरे झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४८ टक्के इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८५ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.५९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६ लाख ३५ हजार ६०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८ हजार ५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८७ हजार ९६९ रुग्ण उपचार घेत आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित चार मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही कमी अधिक कालावाधीपूर्वीचे आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.