गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (08:48 IST)

पुणे वगळून १ डिसेंबरपासून न्यायदानाचे काम दोन शिफ्टमध्ये सुरू

पुणे वगळता राज्यातील सर्व जिल्हा सत्र न्यायालये आणि न्यायदंडाधिकारी न्यायालये १ डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहेत. यासंदर्भातील नोटीस उच्च न्यायालयाचे महानिबंधक एस.जी. दिघे यांनी काढली. पहिली शिफ्ट सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्या. ४.३० वाजेपर्यंत असेल.
 
पहिल्या सत्रात ज्या प्रकरणात पुरावे नोंदवायचे आहेत, अशी प्रकरणे चालविण्यात येतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल दिले जातील. कोरोनाकाळात राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालये मर्यादित क्षमतेने कामकाज करीत होती. मात्र, १ डिसेंबरपासून सर्व न्यायालये पूर्ण क्षमतेने काम करतील. त्यासाठी न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.