बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (08:20 IST)

सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनाधिकृत इमारत बांधलेली नाही. विहंग गार्डन या इमारतींची तक्रार केलेली चुकीची असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करतांना, अनाधिकृतरित्या केलेले नाही आणि करणार ही नाही. असे सांगतांनाच किरीट सोमय्या यांनी जे काही बदनामी केलेली आहे, त्याच्याविरोधात आता थेट न्यायालयात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
 
तसेच विहंग गार्डनच्या बाबतीत 'खोदा पहाड निकला चुहा' अशी म्हणण्याची वेळ आता सोमय्या यांच्यावर आल्याची टिकाही त्यांनी केली.