गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (09:18 IST)

राज्यात २ हजार ५३५ नवे करोनाबाधित दाखल

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ३ हजार १ जण करोनामुक्त झाले. तर, २ हजार ५३५ नवे करोनाबाधित आढळले. याशिवाय ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण १७,४९,७७७ झाली आहे.
 
राज्यात सद्यस्थितीस ८४ हजार ३८६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १६ लाख १८ हजार ३८० रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केलेली आहे. याशिवाय, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ हजार ३४ आहे. सध्या राज्यात ७ लाख ४८ हजार २२६ जण गृह विलगीकरणात आहेत. ५ हजार ३९५ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.