शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (08:34 IST)

पुणे कोरोना संदर्भातील वेगळ धोरण, सोमवारी त्याबद्दलचा निर्णय घेणार

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्के किंवा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु पुण्यातील ग्रामीण भागात अद्याप हे प्रमाण १२ ते १३ टक्के इतके आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचे सरासरी प्रमाण बघता अजूनही जास्त आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड याबद्दल वेगळा निर्णय घेण्यात आला, कारण तेथील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे तिथे शिथिलच्या संदर्भातील वेगळ धोरण सोमवारी त्याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजिर पवार यांनी सांगितले. या निर्णयानुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले आहे.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान तिसऱ्या लाटेचं संकट येऊ नये, परंतु जर कोरोनाचं संकट आलंच तर राज्यात कोणतेही कमतरता राहू नये, यासाठीचे नियोजन गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू केले आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भातील चर्चादेखील करण्यात आली. दरम्यान, कोरोनासंदर्भातील ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रकारचे काम प्रशासनाचे काम सुरू असल्याचे उपमुख्यांनी सांगितले.