मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 मार्च 2024 (12:54 IST)

दारूच्या नशेत वडिलांनी केली मुलाची निर्घृण हत्या

murder
वडील आपल्या मुलांसाठी काहीही त्रास सहन करतात आणि आपल्या मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात. पण बुलढाणा येथे एका जन्मदात्या पिताने दारूच्या नशेत आपल्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्क्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव येथे घडली आहे. शिवाजी प्रल्हाद (33)असे या मयत मुलाचे नाव आहे. तर प्रल्हाद रायपुरे असे आरोपी पिताचे नाव आहे. आरोपी पिताला अटक केली आहे. 

जळगाव जामोद पोलिसांना तरुणाने स्वतःचा मानेवर वार केल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केल्यावर त्यांना हे खून असल्याचा संशय आला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलावले.मयत शिवाजीच्या आईवडिलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना रात्री शिवाजी आणि त्याच्या वडिंलाच्या मध्ये वाद झाल्याचे समजले. शिवाजीच्या वडिलांना दारूचं व्यसन होत.ते नेहमी दारूच्या दुकानात गेल्याचे शिवाजीला आवडत नसे. या कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्याने वडिलांना दारू पिणार असला तर या घरात राहायचे नाही असे म्हटल्यावर वडील रात्रीच घरातून निघून गेले. रात्री जेवण्यानंतर सगळे झोपी गेले असता रात्री शिवाजी त्याच्या खोलीत झोपला होता. सकाळी आईने त्याच्या खोलीत गेल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आईने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी आले. आणि त्यांनी सगळी चौकशी शिवाजीच्या आईवडिलांना केल्यावर वडिलांनी चौकशीत खून केल्याचे कबूल केले. 'पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. 
Edited By- Priya Dixit