सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2024 (15:20 IST)

संत आसाराम बापूची शिक्षा स्थगित होणार? गुजरात हायकोर्टात होणार सुनावणी

संत आसाराम बापू यांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2013 च्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित हे प्रकरण आहे. आसाराम बापू एक दशकापासून तुरुंगात असून शिक्षा भोगत आहे. त्यांच्या याचिकेवर 4 एप्रिल पासून न्यायालयात सुनावणी होणार आहे. आसाराम बापूचे वाढते वय पाहता न्यायालयाने याचिकेवर सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आसाराम बापूंवर अहमदाबाद मधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसाराम बापूंनी सुरत शहरातील बाहेरच्या आश्रमात पीडितेला ओलीस ठेवले होते आणि 2001 ते 2006 दरम्यान तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. या पुर्वी त्यांच्यावर जानेवारी 2023 मध्ये सुरतच्या आश्रमात त्यांच्या अनेक शिष्यांवर बलात्कार केल्या प्रकरणात गुजरातच्या एका ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले होते. आसाराम यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या आधारावर  376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 354 (महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणे), 346 (चुकीने बंदिस्त करणे), 120बी (गुन्हेगारी कट) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषी ठरवण्यात आले. 
 
4 एप्रिलपासून न्यायालयात त्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे.न्यायालयाने म्हटले की, "मुख्य अपील आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी कालमर्यादा आहे. अशा परिस्थितीत आम्ही 4 एप्रिलपासून मुख्य अपीलावर सुनावणी करू.". उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी अपीलची सुनावणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, जेणेकरून आम्ही सुट्ट्यांनंतर निर्णय देऊ शकू, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
 
 Edited by - Priya Dixit