शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (10:31 IST)

झुमका वाली पोर फेम अभिनेता विनोद कुमावत विरोधात बलात्काराचा गुन्हा

rape
प्रसिद्द युट्युबर झुमका वाली पोर फेम अभिनेता व निर्माता विनोद कुमावतच्या विरोधात नाशिकच्या पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विनोद यांनी पीडितेला यु ट्यूबवर प्रदर्शित होणाऱ्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे.  

पीडित महिलेने तक्रार केली आहे की पहिल्या लग्नाचे विचारले असता आरोपी ने तिला लग्नास नकार देत मारहाण केली. तसेच महिलेवर विविध ठिकाणी नेत 30 ऑगस्ट 2023 ते 17 जानेवारी 2024 पर्यंत विविध ठिकाणी नेत बलात्कार केला. 

पीडितेशी आरोपी विनोद ने ओळख करून मैत्री चे प्रेमात रूपांतरण करून लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला. आरोपी विनोद कुमावत हा सातपूरच्या म्हाडा कॉलोनीत राहतो. 
विनोद कुमावत याचे झुमका वाली पोर हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग करत आहे आता पर्यंत या गाण्याला यु ट्यूबवर 225M व्युज मिळाले आहे. 
 
पीडितेने आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 
 
Edited By- Priya Dixit