गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (18:37 IST)

जळगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या

arrest
जळगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपीला अटक केली आहे. 
जळगावातील चोपडा येथे एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेतातून घरी परतताना शेतात ओढून बलात्कार केला नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहे. 

ही घटना शनिवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडा भागात घडली आहे. शेतमजुरीकरून अल्पवयीन मुली काम आटोपून घरी जात असताना चौघी मुलींपैकी एकाला आरोपीने शेतात ओढून नेले. तिच्या बहिणींनी धाव घेत गावाकडे जाऊन हा प्रकार सांगितला. नंतर ग्रामस्थ मुलीला शोधण्यासाठी गेले त्यांना मुलगी कापसाच्या शेतात  विवस्त्र अवस्थेत चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळली. मुलीला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  

पोलिसांना माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले स्थानिक जिन्हें शाखेने रात्री 11 वाजेच्या सुमारास आरोपीला अटक केली. आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  
Edited by - Priya Dixit