रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:04 IST)

आई कपडे धुण्यासाठी गेली असता रुग्णालयातून नवजात बाळ पळवले

जालन्यात नवजात बाळ पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील महिला रुग्णालयातून हे नवजात बाळ पळवण्यात आले आहे. ही घटना सोमवार सकाळी घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार गांधी चमन येथील महिला रुग्णालयात एक महिला आपले बाळ घेऊन कपडे धुण्यासाठी खाली आली होती. या महिलेने बाळ एका अनोळखी व्यक्तीकडे दिले आणि कपडे धुण्यासाठी गेली. तेव्हाच संधी साधून त्या व्यक्तीने बाळ पळवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
 
रुग्णालयाच्ये प्रमुख आर.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे.