मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार आरोप करतो - संजय राऊत
अनिल परब यांचे मुंबईतील कार्यालय तोडण्यात आले. या कारवाईनंतर येथे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. याच कारवाईवर तसेच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. किरीट सोमय्या हलकट माणूस आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते आज (१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“शिवसेना यापुढे राडा करणार आहे. आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. अनिल परब यांच्या कार्यालयावर हतोडा टाकण्यात आला. मुळात ते कार्यालय परब यांचे नव्हते, हे म्हाडाने सांगितले आहे. तरीदेखील भाजपाचा मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार कधी अनिल परब कधी संजय राऊत कधी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करतो.
Edited by : Ratnadeep Ranshoor