गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (21:56 IST)

बारामतीच्या विकासाबाबत झाकली मूठ सव्वा लाखाची - अजित पवार

ajit pawar
ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रियाला सांगतो तिकीट काढ; अजित पवारांची तुफान फटकेबाजी
अजित पवार यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या सभा नेहमीच चर्चेचं कारण ठरत असतात. अजित पवार यांची खास शैली ही त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येते. त्यातच आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या भाषणातील एक खास किस्सा सध्या चर्चेचं कारण ठरतोय. विकास कामांसाठीच्या निधीबद्दल बोलत असताना अजित पवार म्हणाले, कुणाच्या खात्यात किती पैसे आले, हे मी सांगणार नाही. कारण हे चॅनलवाले लगेच बारामतीत कसं चाललंय.. हे सगळीकडेच दाखवतील. अजित पवारांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.
 
अजित पवार यांनी पुढे बोलयला सुरुवात केली. ते म्हणाले, चांद्यापासून बांद्यापर्यंत चालावं. लगेचच एक कार्यकर्ता म्हणाला की, साहेब एवढा एवढा निधी आला आहे. अजित पवारांनी पुन्हा त्या कार्यकर्त्याला थांबवत, "तू बोलू नकोस शहाण्या... आपली झाकली मूठ सव्वा लाखाची" असं म्हणत बारामती काय पण जिल्ह्याला राज्याला देखील निधी मिळावा आणि विकास कामं व्हावीत असं सांगत बारामतीत होत असलेल्या विकास कामाबाबत स्पष्टीकरण दिलंय. बारामती तालुक्यातील विकास कामांच्या पाहणी दरम्यान ते गावकऱ्यांशी बोलत होते.
 
ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो, आणि सुप्रिया ला सांगतो तिकीट काढ...
 
बारामती तालुक्यातील विकासाबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी असं एका कार्यकर्त्यांनं सांगितलं. यावर अजित पवार म्हणाले, होय बाबा सगळी सगळी सोय करायची. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, पवार साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रियाला म्हणतो तू तिकीट काढ...असं अजित पवार म्हणाले अन् हशा पिकला. यानंतर सभेत एकच हाशा पिकला.