शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सिंधुदुर्ग , गुरूवार, 2 मार्च 2023 (15:33 IST)

आठ दिवसाच्या बाळाला तिघा युवकांचे दुर्मिळ गटाचे रक्तदान

blood donation
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी उपचारासाठी दाखल असलेल्या अवघ्या आठ दिवसाच्या बाळाला दुर्मिळ अशा ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या (आर डी पी) प्लेटलेट्ससाठी रक्तदात्यांची गरज होती. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून तीन युवकानी क्षणाचाही विलंब न करता रक्तदान करीत या बाळाचे प्राण वाचविले.मेघना घनश्याम मुणनकर यांच्या फक्त ८ दिवसाच्या बाळाला दुर्मिळ अशा ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या (RDP) प्लेटलेट्ससाठी रक्तदात्यांची गरज होती. याची माहिती मिळताच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी या गटाचे रक्तदाते असलेल्या अभिषेक नाडकर्णी (शिवडाव), ऍलिस्टर ब्रिटो (वेंगुर्ला), गजानन दळवी (न्हावेली) यांचे लक्ष वेधले. त्यानंतर या तिघांनीही तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठून रक्तदान केले.
 
अभिषेक नाडकर्णी हे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे कणकवली तालुकाध्यक्ष असुन त्यांचे हे १४ वे रक्तदान आहे. ऍलिस्टर ब्रिटो हे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष असुन त्यांचे हे १७ वे रक्तदान आहे. तर गजानन दळवी यांचे हे १८ वे रक्तदान आहे. तसेच कोळोशी येथील मंदार राणे हे सुद्धा रक्तदानासाठी जिल्हा रक्तपेढी येथे पोहोचले होते. मात्र केस तूर्तास पूर्ण झाल्याने त्यांना राखीव ठेवण्यात आले. या चारही रक्तदात्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत मुणनकर कुटुंबीयांनी या चारही रक्तदात्यांसह सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
Edited by : Ratnadeep Ranshoor