जळगावात भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली, तरुणाचा मृत्यू
जळगाव सिटी डेअरी फेडरेशनजवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या डंपर ट्रकने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.
जळगाव शहरात डेअरी फेडरेशनजवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करताना विटांनी भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर ट्रकवर आदळला. ट्रॅक्टर उलटल्याने अंकुश भिल (27) याचा मृत्यू झाला.या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे
अपघाता नंतर नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव पोलिसांनी डंपर ट्रकला ताब्यात घेतले आहे. अपघातात अंकुश नावाचा तरुण मृत्युमुखी झाला असून त्याच्या पश्चात् आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. अंकुशच्या कुटुंबावर दुखा:चा मोठा डोंगर कोसळला आहे.
Edited By - Priya Dixit