शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:28 IST)

काळीमा! प्राचार्याकडून विद्यार्थीनीवर बलात्कार

rape
मुंबई : येथे गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राचार्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. मुंबई येथील नागपाडा भागामध्ये हा धक्कादाक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्राचार्य फरार असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत होता, असे पीडितेने तक्रारीत नमुद केले आहे. याबाबत कुणाला सांगितल्यास तू मित्रासोबत फिरत असल्याची माहिती तुझ्या घरातल्यांना सांगण्याची धमकी मुख्यध्यापक देत होते.
 
दरम्यान, प्राचार्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने संबंधित प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्यध्यापक अजुंम खान (५५) विरोधात कलम ३७६(२)एफ, ३७६(३), ३५४, ५०६ भादवि सह कलम ४,८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
.
Edited By- Ratnadeep Ranshoor