1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जुलै 2025 (14:40 IST)

पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात एका महिलेचा मृत्यू,17 जखमी

नाशिक जिल्ह्यातून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला तर  17 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास करमाळा -अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जातेगावजवळ घडली आहे. 
नाशिक जिल्ह्यातून पंढरपूरला भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला भरधाव येणाऱ्या पिकअपने धडक दिली.पिकअप चालक वाहन सोडून पळून गेला.धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहने चक्काचूर झाली. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचावकार्य सुरु केले आणि रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पाठविले. 
या अपघातात नीलाबाई पांडुरंग चकोरे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर सतीश हळदे आणि जिजाबाई हळदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगरयेथील रुग्णालयात आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
तर इतर जखमी झालेल्यांवर देखील उपचार सुरु असून ते निफाड, नाशिकातील  रहिवासी आहे. पोलिसांनी पिकअप वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 
Edited By - Priya Dixit