1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :अकोला , शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (23:06 IST)

धरणात बुडून मायलेकींचा मृत्यू

म्हशीचा शोध घेत असताना पाय घसरुन आई धरणात पडली, वाचवण्यासाठी दोन्ही मुलींच्या पाण्यात उड्या, तिघींचाही मृत्यू
 
अकोला जिल्ह्यात दगडपारवा या गावातील सरिता सुरेश घोगरे, वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे या तिघींचा मृत्यू झालेला आहे. या तिघी म्हशी शोधण्यासाठी गेल्या हाेत्या. म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना तिघीही बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार काल 1 मे रोजी अंदाजे दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान दगड पारवा येथे राहणाऱ्या सारिका सुरेश घोगरे यांची म्हैस हि मिळत नव्हती. त्यामुळे ती शोधण्यासाठी त्या जात असतानाच त्यांना कळले की त्यांची म्हैस गावातील व्यक्तीच्या शेतात आहे. त्या शेताकडे जात असताना तलावाच्या बॅक वॉटरमधून त्यांनी रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या बॅक वॉटर मधील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही.
 
सुरुवातीला आई सारिका घोगरे या पाण्यातून रस्ता काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्या पाण्याचा अंदाज घेऊन न शकल्याने पाण्यात बुडत असल्याचे पाहून मोठी मुलगी वैशाली हिने आईला तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पण पाण्यात बुडत असल्याचे पाहून लहान मुलगी अंजली घोगरे हिने या दोघींना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. परंतु, तीही या पाण्यात बुडाली. या तिघांचाही शोध रविवारी दुपारपासून सुरू होता. मात्र, त्या मिळाल्या नाही.
 
आज सकाळी तलावांमध्ये या तिघांचाही मृतदेह पाण्यावर तरंगत असताना ग्रामस्थांनी त्यांना पाहिला. या तिघींनाही ग्रामस्थांनी बाहेर काढले. या घटनेची माहिती बार्शिटाकळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.