1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (11:06 IST)

व्हॉट्सअप ला स्टेट्स ठेवत तरुणाची आत्महत्या

suicide
दौंड तालुक्यात पारगाव येथे तरुणाने व्हाट्सअप च्या स्टेट्सवर स्वतःचा फोटो लावून श्रद्धांजली देत रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आदित्य ओव्हाळ असे या तरुणाचे नाव असून तो शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील वास्तव्यास होता. आदित्यचे चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. रविवारी सकाळी साढे दहाच्या सुमारास त्याने व्हाट्सअप स्टेटसवर आपले काही फोटो लावले आणि त्यात त्याने भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या मृत्यू मुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 
 
Edited By- Priya Dixit