गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (10:28 IST)

वाढदिवशी केक आणताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू

death
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी केक आणताना झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास शेजवळ असे या तरुणाचं नाव आहे.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 

विकास आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मेहुण्यांसोबत केक आणायला फुलंब्रीला गेला होता.केक घेऊन घरी परत येताना फुलंब्री राजूर मार्गावरील ज्ञान सागर विद्यालयाच्या समोर त्यांच्या दुचाकीला समोरून वेगाने येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विकास आणि त्याचा मेहुणा दोघेही जखमी झाले. अपघातस्थळी लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच विकासाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाढदिवसाच्या दिवशी विकासच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit