गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (07:57 IST)

.लग्न होत नाही म्हणून तरुणाचा पोलीस ठाण्याच्या आवारातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

suicide
नाशिक : प्रेमभंग आणि विवाह होत नाही म्हणून नाशिकमधील एका तरुणाने थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात विष प्राशन केल्याचा प्रकार घडला आहे.
सुदैवाने मुलाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राजेश (वय 28 वर्ष, राहणार: गंगापूर रोड) याचा दोन वेळा विवाह ठरवण्यात आला.
 
मात्र दोनही वेळेस मुलीने विवाह करण्यास नकार दिला. लग्न ठरल्यानंतर ही मुली नकार देत असल्याच्या नैराश्यातून त्याने थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले.
 
पोलीस ठाण्याच्या आवारात त्याने विष प्राशन केले. ठाण्यात पोलिसांनी सर्व प्रकार बघितला आणि तात्काळ राजेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार आहेत. पोलिसांनी तपास केला असता, राजेशचा विवाह ठरल्यानंतर राजेश दारूच्या नशेत मुलीला फोन करतो आणि राजेशची सवय बघून मुलगी त्याला नकार देते असे समोर आले. या नैराश्यातून राजेशने सदर प्रकार केल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.