शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (23:25 IST)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची ईडी कार्यालयात 6 तास चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवले होते.त्यांना आज 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार ते आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. या वेळी ईडीकडून त्यांची 6 तास चौकशी करण्यात आली. संजय पांडे यांना 2 दिवसांपूर्वी ईडी कडून समन्स बजावण्यात आले. त्याच आदेशाचे पालन करत ते आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ते सकाळी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि आपला जबाब नोंदविला. 
 
प्रकरण असे आहे की ,संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता पण तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. त्यानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आणि त्यांनी आपली कंपनी मुलाला चालवायला दिली. 2010 आणि 2015 च्या दरम्यानआयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. यावेळी त्यात मनी लाँड्रिंग घोटाळा झाला होता. या प्रकरणाची चौकशी आता ईडी करत आहे.

माजी पोलीस आयुक्त 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.आता त्यांच्या अडचणी वाढल्या असून सीबीआयने देखील त्यांच्या वर आळा घातला आहे.त्यांच्यावर शंभर कोटी वसुली प्रकरणात पांडे यांनी परमबीरसिंग यांच्यावर लेटर मागे घेण्यासाठी दबाब टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.