बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 30 जून 2022 (08:01 IST)

विवेक फणसाळकर नवे मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आज (30 जून) निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी विवेक फणसाळकर नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. विवेक फणसाळकर सध्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे कार्यरत आहेत. आता त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. विवेक फणसाळकर 1989च्या बॅचेचे आयपीएस अधिकारी आहेत.
 
विवेक फणसाळकर यांची 31 मार्च 2018 रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली.
 
कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता.