सोमवार, 20 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (13:26 IST)

ONGC चं हेलिकॉप्टर पवनहंसला अपघात, 4 जणांचा मृत्यू

accident

मुंबईजवळ समुद्रात पवनहंस हेलिकॉप्टरला मंगळवारी (28 जून) झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑईल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन अर्थात ओएनजीसीचं हे हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली. त्यामागचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
 
मंगळवारी (27 जून) सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात घडला. त्यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि सात प्रवाशांसह 9 जण प्रवास करत होते.
 
खोल समुद्रात ओएनजीसीच्या तेलविहीरी आणि प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी अशी हेलिकॉप्टर्स अनेकदा वापरली जातात. त्यात पाण्यावर आपात्कालीन लँडिंग करण्याची वेळ आली, तर मोठ्या फ्लोटर्सचा वापर केला जातो.
 
मंगळवारी अपघातग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरनंही सागर किरण ऑईल रिगजवळ आपात्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही जागा मुंबईच्या किनाऱ्यापासून साधारण 60 नॉटिकल मैल (सुमारे 111 किलोमीटर) अंतरावर बॉम्बे हाय तेलक्षेत्रात आहे.
 
दुर्घटना झाल्यावर लगेचच वेगानं बचावकार्य सुरू झाल्याची माहिती ओएनजीसीनं दिली आहे. भारतीय नौदल आणि कोस्टगार्डनंही बचावकार्यात मदत केली. खराब हवामानात ही मोहीम राबवण्यात आली.
 
ओएनजीसीनं जाहीर केलेल्या माहितीनुसार सागर किरण रिगवरील लाईफ बोटनं एकाचा जीव वाचवला. तर ओएनजीसीच्या मालविय16 या जहाजानं आणखी चार जणांना वाचवलं.
 
नौदलाच्या हेलिकॉप्टरनं इतर चार जणांना बाहेर काढलं तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना जुहू इथे रुग्णालयात नण्यात आलं, पण त्यांचा जीव वाचू शकला नही.
 
हा अपघात कशानं घडला याची चौकशी सुरू असल्याचं ओएनजीसीनं म्हटलंय. कंपनीनं या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे आणि मृतांच्या कुटूंबियांना शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासनही दिलंय.