शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 19 जून 2022 (12:52 IST)

वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात,1 ठार, 28 जखमी

आळंदीला जाण्यासाठी शिरवळ कोल्हापुर जिल्ह्यातून भाडळे आणि लाहोटे येथून  निघालेला  वारकऱ्यांच्या वाहनाचा शिरवळला पहाटे अपघात झाला. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर 28 वारकरी जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मायाप्पा कोंडीबा माने(रा.भादुले,ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर मारुती भेरूनाथ कोळी हे गंभीर जखमी झाले आहे. 
 
हा अपघात पुणे बंगळूर महामार्गावरील साताऱ्यातून पुणे आळंदी ला जाताना शिरवळला पहाटे 3 वाजेच्या सुमारास झाला .वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव येणाऱ्या भाजीच्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की काही वारकरी उडून रस्त्यावर फेकले गेले.या अपघातात 28 वारकरी जखमी झाले आहे. अपघातात जखमी झालेल्यानां शिरवळच्या रुग्णालयात दाखल केले असू त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हे सर्व  वारकरी भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील आहे.