रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:36 IST)

वादळी पावसाचा तडाख्यामुळे भिंत कोसळून चार जण जखमी

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात मायणी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने येथील बाजार पटांगणात जवळ असलेल्या एका घराची भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची बातमी मिळत आहे. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
अचानक आलेल्या या वादळी पावसानं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील शेतकरी, उत्तम कापरे यांच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. एका व्यक्तीच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली.