देशातले सध्याचे राज्यकर्ते सभ्य, सुसंस्कृत नाहीत; शरद पवारांचा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा
पुण्यातील कनेक्ट महाराष्ट्र काँक्लेव्ह कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान या तिन्ही नेत्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी भाजपवर, केंद्रीय यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला. ईडी, सीबीआयच्या कारवाईबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले याचं उत्तर आम्ही 2024 ला देऊ, तर शरद पवारांनी देशात सध्या असणारे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत असं म्हटलं आहे.
देशात सध्या शिवलिंग शोधण्याचं काम होतंय, प्रत्येक मशिदीखाली यांना शिवलिंग दिसतंय. मात्र तिकले मानसरोवर हे चिनच्या ताब्यात आहे, ते सोडवून का आणत नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला. काश्मिरी पंडितांच्या मुद्दयावर बोलताना शरद पवार म्हणाले काश्मिर फाईल्स हा चित्रपट जाणीवपूर्वक तयार केला गेला. मात्र त्यावेळी सुद्धा भाजपचं सरकार होतं आणि आजही भाजपचं सरकार होतं असं शरद पवार म्हणाले.