म्हाडा: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न
आपले घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु हे अनेकांना शक्य होत नाही. यासाठी राज्य शासन म्हाडाअंतर्गत (MHADA Home Plan) सामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. त्यामुळे आतासुद्धा स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी मुंबईमध्ये दिवाळीत म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2022 Mumbai) निघणार आहे. येत्या काही दिवसांत या बाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. पुण्यासह पिंपरी, चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश आहे. म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी माहिती दिली की गेल्या काही वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही दहावी सोडत ठरली आहे. गेल्या 2 वर्षात म्हाडाने काढलेली ही चौथी तर या वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही दहावी सोडत ठरली आहे. जाहिरात प्रसिद्ध करून त्यानंतर इच्छुकांना घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. जाहिरात प्रसिद्द झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.