1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 26 जानेवारी 2022 (16:19 IST)

सदनिकासाठी सिडको लॉटरी 2022 जाहीर

घराचे स्वप्न पाहणारे नागरिकांचे स्वप्न साकार होणार आहे. नवी मुंबईत 5 हजार 730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  26 जानेवारी पासून सदनिकाच्या लॉटरी साठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही माहिती राज्याचे शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ही घरे नवी मुंबईतील  कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे आहे.
 
नवी मुंबईत सिडकोकडे पांच हजार घरांसाठी 'महागृह निर्माण' योजना आहे. या घरकुल योजना अंतर्गत दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न वर्गाच्या लोकांसाठी  घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरीमध्ये घरे उपलब्ध असणार. सिडकोची घर लॉटरी नोंदणी प्रक्रिया 26 जानेवारी, 2022 पासून सकाळी 11 वाजता सुरू होऊन 24 फेब्रुवारी, 2022 रात्री 8 वाजे पर्यंत असणार. अर्जदार घरासाठी नोंदणी सिडको वेबसाइट https://lottery.cidcoindia.com/App/ या संकेत स्थळावर जाऊन करू शकतात . घरांसाठी ऑनलाइन अर्ज गुरुवार 27 जानेवारी 2022 दुपारी 12 वाजे पासून उपलब्ध होतील. घरासाठीचे अर्ज  25 फेब्रुवारी रोजी रात्री 11.59 वाजे पर्यंत स्वीकारले जाईल.