सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:01 IST)

भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा नाही

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राणे यांच्या अर्जावर आता 27 तारखेला सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत.
 
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने  राणे यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यानंतर राणे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात  धाव घेतली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर 27 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.
 
नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळ्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राणे यांनी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. यावर 27 जानेवारीला सुनावणी घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश रमणा यांनी सांगितले.