मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (15:03 IST)

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टॉलचा शुभारंभ

Launch of Ticket Sales Stall at Mantralaya of Maharashtra State Lottery महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टॉलचा शुभारंभMaharashtra Regional News In Webdunia Marathi
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टॉलचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.
 
मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात हा स्टॉल 12 एप्रिल पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. 12 एप्रिल 2022 रोजी सायं. 04.00 वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या 8602 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू.51 लाख असून, तिकीटांची किंमत रू. 200 आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. 98 लाख 55 हजार आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
 
यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, प्रशांत पाटील, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनील  लोटणकर उपस्थित होते.