शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (15:00 IST)

1000 कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू

शासकीय योजनेतून गटांना दिल्या जाणाऱ्या एक हजार कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पोंभुर्णा तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. 
 
हजार पिल्लांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तरी पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे पिल्लांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
 
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमाअंतर्गत एका लाभार्थ्याला 100 पिल्ले वितरित केले जातात. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने योजनेसाठी लाभार्थ्यांकडून मागितलेल्या अर्जानुसार तालुक्यातील 17 जणांना कोंबडीची पिल्ले मंजूर झाली आणि त्यानुसार पिल्लांचे वाटप करण्यात येणार होते.
 
पोंभुर्णा तालुक्यातील गावांतील दहा लाभार्थी पिल्ल्यांसाठी येणार होते. अशात पिल्ले पशुसंवर्धन विभागातच ठेवण्यात आली होती मात्र उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे त्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही आणि सुमारे 1000 पिल्ले दगावली.
file photo