म्हाडा ऑनलाईन परीक्षेत संगणकीय प्रणालीत फेरफार  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  फेब्रुवारीत झालेल्या म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर गैर प्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समनव्य समितीने केला आहे. या परीक्षा केंद्रात केंद्र चालकाशी संगमनत करून परीक्षेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	म्हाडाच्या 565 रिक्तपदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याने डिसेंबर मधील परीक्षा रदद्द  करण्यात आल्या असून या प्रकरणात टी ईटी सह इतर भरती घोटाळे देखील उघडकीस आले. या संदर्भात गुन्हा नोंदवला असून अनेकांना अटक करण्यात आली. 
				  				  
	 
	या नंतर म्हाडाने टीसीएस चाय माध्यमातून ऑनलाईन परीक्षा आयोजित केली या साठी राज्यभरातील कॉम्प्युटर केंद्राची निवड परीक्षा केंद्र म्हणून करण्यात आली.या ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेत औरंगाबादच्या एका केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समनव्य समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	औरंगाबादतील एका परीक्षा केंद्रावर संगणकीय प्रणालीत फेरफार झाल्याचे पुरावे देखील आहे. हे पुरावे पुण्याच्या मंडळाकडे सादर केले आहे. या संदर्भात तक्रार समितीने म्हाडाकडे पुराव्यानिशी करत टीसीएस कडून स्पष्टीकरण मागविले आहे. तत्पश्चात या संदर्भात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला जाईल.