मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:58 IST)

जाहीर कार्यक्रमात तलवारबाजीमुळे वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा

जाहीर कार्यक्रमात तलवार काढणं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यासाठी अडचणीचं ठरलं आहे.
 
तलवार काढल्याप्रकरणी दोन्ही मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईत काही दिवसांपूर्वी एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर आपल्या हातात तलवार घेतली होती.
 
या दोघांचे तलवारीसह फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
 
मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनीही तलवार नाचवली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल का नाही असा सवालही उपस्थित केला होता. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.