गंगलोर परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक डीआरजीचे दोन जवान जखमी
छत्तीसगडमधील बिजापू जिल्ह्यातील गंगलुर भागात नक्षलविरोधी कारवाईसाठी निघालेल्या डीआरजी टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळपासून चकमक सुरू आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे.
या चकमकीत दोन डीआरजी जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही जखमी जवान पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत आणि त्यांची प्रकृती सामान्य आहे. प्राथमिक उपचारानंतर, त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी रायपूर येथे रेफर करण्यात आले आहे.