एक कोटीची लॉटरी लागली, पावणे वीस लाखांना ऑनलाईन गंडा
एक करोडच्या लॉटरीचे आमिष दाखवून नाशिकमध्ये एका महिलेला पावणे वीस लाखांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजाता शिरसाठ असे या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. या नाशिकच्या पंचवटी येथील मधूबन कॉलनी येथे राहतात. त्यांना २०१८ मध्ये एक निनावी फोन फोन आला. तूम्हाला ०१ करोड रुपयांची लॉटरी लागली असून ही रक्कम मिळण्यासाठी तुम्हला टॅक्स भरावा लागेल, असे सांगून संशयितांनी त्यांच्या बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले.
तर फिर्यादी महिलेने देखील त्यांच्या आमिषाला बळी पडून वेळोवेळी सांगितल्या प्रमाणे त्या खात्यावर जवळजवळ १९ लाख , ७७ हजार १४२ एवढी रक्कम भरली. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या बाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहे.
याप्रकरणी राजेंद्र भारद्वाज, विजय नारायण, दिनेह मेन, सोनिया, दिव्य शर्मा, राहुल सिंग, राकेश कुमार, सुनील यादव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चोपडे करत आहेत.