सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (16:47 IST)

जवान नितेश मुळीक आसाम सीमेवर लढताना शहीद

चंदगड तालुक्यातील करंजगावचे जवान नितेश मुळीक(25) आसाम सीमेवर लढताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजता घडली. या घटनेची माहिती त्यांच्या गावी त्यांच्या वडिलांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी कळवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या गावात आणि चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सांयकाळी करंजगावात आणण्यात येईल. त्यांच्या गावी करंजागावात शासकीय इतमामात त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येईल.