1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (15:18 IST)

देशातील सर्व पक्षाने भाजपविरूद्ध एकत्र येण्याचा प्रयत्न केला, पक्षांचं एकत्र येण्याचं लक्ष हे चुकीचं : मुनगंटीवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशातील सर्व पक्षाने भाजपविरूद्ध एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पक्षांचं एकत्र येण्याचं लक्ष हे चुकीचं आहे. हे देशहितासाठी , जनहितासाठी आणि लोकहितासाठी कधीही एकत्र आलेले नाहीयेत. मोदी हटाव हा एकच विचार त्यांचा आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी घोषणा झाली. त्याअगोदर त्यांनी गुजरातचा राज्यकारभार उत्तम करून गुजरातचे निर्णय हे देशामध्ये कशापद्धतीने लोकप्रिय केलेत याचे जाणीव आहे. महाराष्ट्रातल्या सरकारचा मद्य विक्री करणाऱ्या लोकांसाठी समर्पित सरकार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.
 
यशाचं श्रेय हे मोदींच्या परीश्रमात कार्यकर्त्यांच्या श्रमाला आणि ईश्वराचा अंश असलेल्या जनतेच्या आशीर्वादाला द्यावा लागेल. या श्रेयासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी व्यवस्थितपणे कार्य केल्यामुळे हे श्रेय सर्वांचं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.