रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:08 IST)

ईडीने बोलावलं म्हणून गप्प बसलो नाही; राज ठाकरेंच्या नकलांवर राऊतांचे प्रत्युत्तर

sanjay raut shivsena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाषणशैली आणि बोलण्याची पद्धत याची नक्कल करत राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. या टोलेबाजीवर आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. ‘ईडीने आम्हाला बोलवल म्हणून आम्ही गप्प नाही बसलो’ अशा शब्दात टीका केली. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. 
 
यावेळी राऊत नक्कल मोठ्या माणसाची केली जाते….. तुम्ही बोला, तुम्ही बोलले पाहिजे, सगळ्यांना बोलावे अशी परिस्थिती आहे. आम्हाला ईडी ने बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहणार आणि बोलत राहू आम्हाला कुणाची भीती नाही आणि आम्ही कुणाचे मिंदे नाही अशी परखड टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
 
राऊत पुढे म्हणाले, आम्ही बोलत राहू…. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट काही नाही. जे सत्य आहे. जे परखड आहे ते शिवसैनिक बोलणार,कर नाही तर डर कशाला. शिवसेना स्वाभिमानावर आणि संघर्षावर उभी असं संजय राऊत  म्हणाले.